कमी कालावधी साठी पैसे कोठे गुंतवावेत?

लिक्विड म्युच्युअल फंडस (Liquid Mutual Funds) म्हणजे काय?

सध्या शेअर बाजार हा शिखरावर आहे तसेच दिवसेंदिवस तो नवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. परंतु कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या मते शिखरावर असणाऱ्या बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्याच्या दृष्टीने बाजार परत खाली आल्यावर त्यात गुंतवणूक करणे हे योग्य आहे. मग असलेले पैसे हे कमी कालावधी साथी कोठे गुंतवावेत. दोन पर्याय आपल्यापुढे उभे राहतात ते म्हणजे

 1. मुदत ठेव (Fixed Deposite)
 2. लिक्विड म्यूचुअल फंडस (Liquid Mutual Funds)

तर या दोन्ही मधला योग्य पर्याय कोणता हे आपण या लेखामध्ये पाहूया. वरील दोहोंपैकी मुदत ठेव हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. तसेच याला 5 लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. परंतु सध्या मुदत ठेवीचा दर दिवसेंदिवस कमी होत आहे. बचत खात्याचा दर हा 3% पेक्षा खाली आला आहे. म्हणजे महागाईच्या दराच्या तुलनेत तुमचे पैसे कमी होत आहेत.

आता आपण लिक्विड म्यूचुअल फंडस (Liquid Mutual Funds) विषयी जाणून घेऊयात.

लिक्विड म्यूचुअल फंडस (Liquid Mutual Funds) हे कमी जोखमीचे(Low Risk) प्रकारात मोडतात. हे फंड्ज पैसे शेअर बाजारात गुंतवत नाहीत. हे फंडस प्रामुख्याने ट्रेजरी बिल्स(treasury bills), कमर्शियल पेपर्स(commercial papers), मुदत ठेव प्रमाणपत्र(certificates of deposits) इत्यादी मध्ये गुंतवणूक करतात.

लिक्विड म्यूचुअल फंडस (Liquid Mutual Funds) मध्ये गुंतवणुकीचे फायदे

 1. उपलब्धता आणि कालावधी- जर तुम्हाला कोणत्याही कारणासाठी लगेच पैसे हवे असतील तर ते तुम्ही अगदी सहजपणे 24 तासात काढू शकता. परंतु जर मुदत ठेवीचे पैसे मुदतपूर्व काढल्यास तुम्हाला व्याज कमी मिळते. तुम्ही कितीही कालावधी साथी पैसे त्यात गुंतवू शकता.
 2. परतावा(returns)- गेल्या काही वर्षातील फंडस चा आलेख पाहत यांनी जवळजवळ 7.1% परतावा दिल आहे जो की बचत खात्याच्या व्याजच्या दुप्पट आहे.(3.5*2=7)
 3. कर(tax)- कराच्या बाबतीत हे फंडस मुदत ठेवी पेक्षा चांगले आहेत. कारण मुदत ठेवी चे व्याज हे त्या वर्षीच्या उत्पन्नात गणले जाते ज्यावर तुमच्या टॅक्स स्लॅब(tax slab) प्रमाणे कर भरावा लागतो. या म्यूचुअल फंड वर कॅपिटल गेन टॅक्स(capital gain tax) लागतो. जर तुम्ही 3 वर्षांच्या आत पैसे काढल्यास त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन(Short term capital gain tax) टॅक्स भरावा लागतो.(टॅक्स स्लॅब प्रमाणे). नाहीतर तेथे लोंग टर्म कॅपिटल गेन(Long term capital gain tax) भरावा लागतो ज्यामध्ये महागाई चा फायदा मिळतो.
 4. टीडीस् (tds)- जर मुदत ठेवी वरील व्याज हे 10000 रुपयांपेक्षा जास्त झाल्यास त्यावर 10% प्रमाणे कर बसतो तर फंडच्या बाबतीत तुम्ही indexation चा फायदा घेऊ शकता.(3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ठेवल्यावर)
 5. लवचिकता(Flexibility)- या फंडस मध्ये लवचिकता असते म्हणजे आपल्या सोईप्रमाणे पैसे गुंतवू शकतो. जसे पहिला महिना-700, दुसरा -900, तिसरा-300 आणि एखादा महिना जरी गुंतवले नाही तरी चालते.
 6. एमर्जन्सि फंड(emergency fund)- या फंड मध्ये तुम्ही आपत्कालीन ठेव म्हणून सुद्धा गुंतवणूक करू शकता.

आता आपण काही महत्वाचे फंड पाहूया(जास्त कालावधी साठीचे सरासरी )

फंड नाव 3 वर्षे 5 वर्षे 10 वर्षे
Aditya Birla sun life liquid5.996.457.77
Axis liquid5.986.447.73
Baroda liquid5.936.427.74
BNP Paribas liquid5.936.377.70
BOI AXA liquid5.856.357.42
वरील सर्व माहिती valuereasearchonline वेबसाइट वरुण प्राप्त केली आहे.

One thought on “कमी कालावधी साठी पैसे कोठे गुंतवावेत?

 • February 11, 2021 at 3:05 PM
  Permalink

  thanks for useful information

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *