NSE Vs BSE कुठे खरेदी करू?

नवीन शेअर घेताना NSE वर खरेदी करायचा कि BSE वर? जर तुम्ही शेअर बाजारात नवीन असाल तर हा प्रश्न तुम्हाला हमखास पडला असेल. आपण या लेखामध्ये या दोन्ही बद्दल जाणून घेऊया.

काय आहे NSE?

NSE म्हणजे National Stock Exchange of India. NSE हा भारतातील सर्वात मोठा स्टॉक एक्स्चेंज(Stock Exchange) आहे. याची स्थापना 1992 साली झाली होती. Nifty 50 हा NSE चा निर्देशांक(Benchmark Index) आहे. NSE वर 1700 पेक्षा जास्त कंपन्या नोंदणीकृत आहेत. NSE च्या Nifty 50 निर्देशांकमध्ये 50 कंपन्यांचा समावेश होतो.

काय आहे BSE?

BSE म्हणजेच Bombay Stock Exchange of India हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्स्चेंज(Stock Exchange) आहे. याची स्थापना 1875 साली झाली होती. SENSEX हा BSE चा निर्देशांक(Benchmark Index) आहे. यामध्ये 30 कंपन्यांचा समावेश होतो. BSE वर 5700 पेक्षा जास्त कंपन्या नोंदणीकृत आहेत.

आता आपण जाऊया मूळ प्रश्नाकडे खरेदी कोठे करायचा?

BSE वर 5700 पेक्षा जास्त कंपन्या आहेत जर तुम्हाला पाहिजे असलेला शेअर जर फक्त BSE वर उपलब्ध असेल तर तो तुम्हाला तेथेच घ्यावा लागेल आणि तेथेच विकाव लागेल. परंतु जर एखादा शेअर दोन्ही एक्स्चेंज वर उपलब्ध असेल तर तुम्ही तो कुठेही खरेदी विक्री करू शकता. जरी तुम्ही शेअर NSE वर खरेदी केला असेल तरी तुम्ही तो BSE वर विक्री करू शकता तसेच BSE वर खरेदी करून NSE वर विक्री करू शकता.

थोडक्यात सांगायचे झाले तर NSE आणि BSE हे तुम्हाला शेअर खरेदी विक्री करण्याचे ठिकाण आहे. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही खरेदी विक्री करू शकता. जरी BSE वर शेअर ची उलाढाल कमी असली तरी किंमत दोन्ही ठिकाणी जवळपास सारखीच असते.

जाणून घ्या लिक्विड म्युच्युअल फंडस (Liquid Mutual Funds) म्हणजे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *