ETF म्हणजे काय? ETF मधील गुंतवणुकीचे महत्व?
ETF म्हणजेच Exchange Traded Fund हि एक कमी खर्चीक म्युच्युअल फंड योजना आहे. जाच्या भागांची(units) खरेदी विक्री एखाद्या शेअर प्रमाणे खुल्या बाजारात होते. ETF मध्ये विविध प्रकारच्या रोखे जसे की शेअर, सोने, सरकारी रोखे यांचा समावेश होतो.
भारतीय शेअर बाजारात INDEX ETF हे लोकप्रिय आहेत. म्हणजे ते प्रमुख शेअर बाजार निर्देशांक NIFTY, BANKNIFTY, SENSEX यांना फॉलो(follow) करतात. समजा जर तुम्ही NIFTY 50 ETF मध्ये पैसे गुंतवले आहेत तर तुमच्याकडे Nifty निर्देशांकतील 50 स्टॉक्स चे भाग आहेत. आज Nifty 50 निर्देशांक आहे 15163 वर आणि Nifty ETF NIFTYBEES आहे 161 रुपयांवर.(थोडा tracking error किमतीमध्ये असतो). ही 161 रुपये या ETF ची NAV(net asset value) आहे. जसा निर्देशांक वाढतो तशी NAV वाढत जाते तसेच निर्देशांक खाली आल्यावर NAV कमी होते. मार्च 2020 मध्ये जेव्हा Nifty 7500 च्या आसपास होता तेव्हा याची NAV ही 85 च्या आसपास होती.
वरील उदाहरण पाहून आपल्या लक्षात येते की Index ETF हा भारतातील सर्व महत्वाच्या कंपनी मध्ये त्याच्या weightage प्रमाणे गुंतवणूक करतो. स्टॉक मार्केट हा एक zerosum व्यवसाय आहे. म्हणजे एखाद्याला नुकसान झाले तरच दुसऱ्याचा फायदा होतो म्हणून सर्वच स्टॉक मार्केट खरेदी करून ते कायम ठेवणे(Hold Forever) म्हणजे एखाद्या देशातील सर्व business विकत घेण्यासारखे आहे. हे index ETF द्वारे शक्य होते.आतापर्यंत(since inception) NIFTY 50 ने 10.90% चा वार्षिक परतावा दिला आहे.
ETF चे काही प्रकार:-
गोल्ड ETF:- यामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ईटिफ् चा समावेश होतो. हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरातील चढ उताराप्रमाणे यांची किमत बदलत असते. भारतातील प्रमुख गोल्ड ETF-GOLDBEES
इक्विटि(Equity) ETF:- या प्रकारचे ETF हे प्रामुख्याने स्टॉक्स च्या बास्केट मध्ये गुंतवणूक करतात. या बास्केट मध्ये एखाद्या सेक्टर चे अथवा निर्देशांकचे शेअर(स्टॉक्स) असतात.
बॉन्ड(Bond) ETF:- या प्रकारच्या ETF मध्ये सरकारी बॉन्ड(रोखे), कॉर्पोरेट बॉन्ड इ. चा समावेश होतो. उदाहरण- LIQUIDBEES.
ETF मध्ये गुंतवणुकीचे फायदे:-
- जर तुम्ही सोन्यामध्ये(दागिने) गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते विकत घेताना त्यावर मजुरी द्यावी लागते तसेच त्यावर टॅक्स भरावा लागतो. आणि जरी तुम्हाला ते दागिने विकून पैसे घ्यायचे असतील तर त्यावर घट धरली जाते तसेच त्यावरील मजुरी वाया जाते. पण ETF द्वारे त्याची खरेदी पण सोपी आहे आणि विक्री देखील. तसेच त्यात साठवणुकीचा धोका कमी होतो. तसेच नफावसुली सहजपणे करता येते.
- त्यामुळे इंडेक्स ETF मधील गुंतवणूक ही विभागलेली(Diversified) म्हणजेच कमी जोखमीची असते. जरी काही शेअर नि चांगला परतावा दिला नाही तर जास्त नुकसान होत नाही.
- इंडेक्स ETF हे स्टॉक निवड, मार्केट सेक्टर निवड तसेच फंड व्यवस्थापक निवड याच्यातील धोका कमी करतात म्हणजे एकच धोका राहतो तो म्हणजे निर्देशांकचा चढउतार.
ETF मध्ये गुंतवणुकीचे तोटे:-
- जर तुम्हाला एखादा ETF यूनिट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तो ब्रोकर कडून खरेदी करावा लागतो तसेच त्यासाठी तुमचे demat खाते असणे गरजेचे असते.
- जर काही कालावधीसाथी निर्देशांक स्थिर राहिले तर यातून परतावा कमी मिळतो. तसेच निर्देशांकची घसरण झाल्यास त्यातून वजा परतावा मिळतो.
जर तुम्ही शेअर बाजारत नवीन असाल तर INDEX ETF हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच जर तुम्हाला स्टॉक अनॅलिसिस करायला वेळ मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.
भारतातील काही महत्वाचे ETF
SYMBOL | UNDERLYING ASSET | NAV 10-Feb-2021 | 52W H | 52W L |
LIQUIDBEES | Government Securities | 1000 | 1,009.90 | 990 |
BANKBEES | Nifty Bank | 359.27 | 367 | 169.55 |
GOLDBEES | Gold | 41.79 | 51.5 | 34.46 |
NIFTYBEES | Nifty 50 | 162.07 | 179.7 | 81 |
EBBETF0430 | Nifty BHARAT Bond | 1,118.28 | 1200 | 991.1 |
सिल्वर ईटीएफ(Silver ETF) काय आहे? Silver ETF investment in marathi
https://traderskatta.com/index.php/2022/02/07/silver-etf-investment-in-marathi/