कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट काय असतात?

कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट हे टेक्निकल अनॅलिसिस मध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय चार्ट आहेत. कॅन्डलस्टिक मध्ये किमतीचे मुख्य निर्देशांक जसे open, high, low आणि close यांचा समावेश होतो. त्यामुळे किमतीचे विश्लेषण डोळ्यांनी बघताक्षणीच होते.

कॅन्डलस्टिक चार्ट पद्धती ही शिकायला सर्वात सोपी तसेच एकदा शिकली की कायम लक्षात राहणारी आहे. चार्ट पाहूनच तुम्ही लगेच एखाद्या शेअर अथवा commodity चे विश्लेषण करू शकता. कितीही कालावधी साठी कॅन्डलस्टिक चार्ट वापरता येतो जसे की 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 1 दिवस इ. एखाद्या पॅटर्न ओळखण्यासाठी, trendline काढण्यासाठी, सपोर्ट आणि resistance पाहण्यासाठी कॅन्डलस्टिक चार्ट वापरले जातात.

वरच्या दर्शवलेली कॅन्डल मध्ये किंमत(price) हि त्या वेळेत(time period) खाली open झाली आणि नंतर वाढत जाऊन open पेक्षा वरती बंद झाली. म्हणून या कॅन्डल चा रंग हिरवा आहे. या कॅन्डल ला Bullish कॅन्डल असे म्हणतात.

याउलट 2. क्रमांकाच्या कॅन्डल मध्ये किंमत open जास्त किमतील झाली आणि बंद होताना ती open पेक्षा खाली झाली. म्हणून या कॅन्डल चा रंग हिरवा आहे. या कॅन्डल ला Bearish कॅन्डल असे म्हणतात.

आता आपण दोन्ही आकृती समजून घेऊया. आकृती 1 हि बाजारत तेजी(uptrend) चालू असताना तयार होते. यामध्ये किमत त्या वेळेला open होते. त्यानंतर ती मंदी करणारे(Bears) कडून खाली आणली जाते(low). परंतु तेजी करणारे(Bulls) कडून ती परत वरती नेली जाते(high). वरती गेल्यानंतर ती किमत पुन्हा थोडी कमी होते. आणि त्या कॅन्डल चा कालावधी संपल्यानंतर बंद(close) होते. याउलट आकृती 2 मध्ये किंमत मंदी करणारे(Bears) कडून खाली आणली जाते(low). आणि open किमतीपेक्षा कमी ने बंद(close) होते.(Bearish candle)

Upper Shadow आणि Lower Shadow:- जेव्हा तेजी करणारे(Bulls) कडून किंमत वरती नेली जाते(high) आणि वरती गेल्यानंतर ती किमत पुन्हा थोडी कमी होते आणि बंद होते. तेव्हा high आणि close मधील रेषेला upper shadow म्हणतात. जेव्हा मंदी करणारे(Bears) कडून किंमत खाली नेली जाते तेव्हा open(Bullish कॅन्डल) किंवा close(Bearish कॅन्डल) पासून low पर्यन्त असलेल्या रेषेला Lower Shadow म्हणतात.

आता आपण उदाहरण पाहूया.

Infosys stock open-1200, high-1215, low-1195, close-1210 14feb

वरील आकृती मध्ये आपण इन्फोसिस शेअर चे उदाहरण पाहूया. हा शेअर 14 फेब्रुवारी रोजी 1200 ला open झाला आणि 1210 ला बंद(close) झाला. त्याची कॅन्डल ही अशाप्रकारे दिसेल. दिवसभरात त्याने 1195 चा low touch केला(lower shadow) आणि 1215 चा high नोंदवला(upper shadow). या शेअर मध्ये तेजी करणारे मंदी करणाऱ्यांपेक्षा वरचढ ठरले आणि कॅन्डल ग्रीन रंगाने बंद झाली.

Reliance stock open-1900, high-1905, low- 1885, close-1890 14feb

वरील आकृती मध्ये आपण reliance शेअर चे उदाहरण पाहूया. हा शेअर 14 फेब्रुवारी रोजी 1900 ला open झाला आणि 1890 ला बंद(close) झाला. त्याची कॅन्डल ही अशाप्रकारे दिसेल. दिवसभरात त्याने 1885 चा low touch केला(lower shadow) आणि 1905 चा high नोंदवला(upper shadow). या शेअर मध्ये मंदी करणारे वरचढ ठरले आणि कॅन्डल रेड रंगाने बंद झाली. आणखी कॅन्डल बद्दल जाणून घेण्यासाठी पुढचा लेख जरूर वाचावा.

आणखी वाचा स्टॉक मार्केट बेसिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *