कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट कसा वाचायचा?

मागच्या लेखात (कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट काय असतात?) हे आपण पहिले होते. तसेच कॅन्डल चार्ट पॅटर्न मधील महत्वाच्या संज्ञा समजून घेतल्या. या लेखात कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट कसा वाचायचा? हे आपण पाहणार आहोत.

chart example
chart example from upstox

यासाठी आपण RELIANCE कंपनीचा स्टॉक पाहणार आहोत. मी माझ्या ब्रोकर(upstox) च्या प्लॅटफॉर्म वरील चार्ट वापरला आहे. या चार्ट वर 15 मिनिट वेळ(timeframe) निवडलेली आहे. वरील इमेज च्या आडव्या बार वर वेळ लिहली आहे जसे 9.15, 9.30, 9.45 ई. आणि उभ्या बार वर स्टॉक ची किमत लिहली आहे. म्हणजेच या चार्ट वर दर 15 मिनिटाला एक नवीन कॅन्डल तयार होत आहे. 9.15 च्या कॅन्डल चा open हा close पेक्षा कमी आहे म्हणून या कॅन्डलचा रंग ग्रीन(Bullish) आहे. तर 9.30 च्या कॅन्डल चा open हा close पेक्षा जास्त आहे म्हणून या कॅन्डल चा रंग रेड(Bearish) आहे.

अशाप्रकारे प्रत्येक कॅन्डलस्टिक मध्ये किमतीचे मुख्य निर्देशांक जसे open, high, low आणि close यांचा समावेश होतो. आपण आपल्याला पाहिजे त्या वेळेसाठी हे पाहू शकतो. वरील चार्ट मध्ये 15 मिनटच्या कॅन्डल चा समावेश केला आहे. म्हणजे त्यात आपल्याला दर 15 मिनिटाला स्टॉक ची किमत कशी होती याबद्दल समजते.

जर आपण 1 तास वेळ निवडली तर 9.15, 10.15, 11.15…… अशा दर तासाला कॅन्डल तयार होतील. या कॅन्डल वर त्या वेळेचा open, high, low, close दिसेल. त्याचा चार्ट आपण खालील इमेज मध्ये पाहूया.

1 hour cchchacharchartchart

अशाप्रकारे आपण कितीही वेळेसाठी(timeframe) कॅन्डलस्टिक चार्ट पाहू शकतो. त्यामुळे किमतीचे त्या काळासाठीचे behaviour आपल्याला समजते. जशी किंमत बदलत जाते तशा कॅन्डल तयार होत जातात.

या लेखात आपण कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट कसा वाचायचा हे पहिले. तुम्ही तुमच्या ब्रोकर च्या प्लॅटफॉर्म वर प्रत्यक्ष लॉगिन करून हे बघितले तर तुमच्या लगेच लक्षात येईल. जशा या कॅन्डल तयार होत जातात त्यांचा आकार हा किंमतीचे वैशिष्ट्य(price behaviour) दर्शवतो. कॅन्डलस्टिक चार्ट अनॅलिसिस हा कोणत्याही स्टॉक,इंडेक्स इ. चा कल(trend) ओळखण्यासाठी खूप उपयोगी आहे. प्रत्येक कॅन्डल चा आकार, open, close, high, low तसेच upper shadow आणि lower shadow(wicks) यावरून त्याचे काही प्रकार पडतात ते आपण पुढच्या लेखात पाहूया.

जर तुमचे काही प्रश्न असतील तर खालील comment बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *