गोल्ड ईटीएफ(Gold ETF) बद्दल माहिती

गेल्या लेखात आपण ETF म्हणजे काय? ETF मधील गुंतवणुकीचे महत्व? पाहिले. ETF म्हणजेच Exchange Traded Fund हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड आहे. जाच्या भागांची(units) खरेदी विक्री एखाद्या शेअर प्रमाणे खुल्या बाजारात होते. ETF मध्ये विविध प्रकारच्या रोखे जसे की शेअर, सोने, सरकारी रोखे यांचा समावेश होतो.या लेखात आपण गोल्ड ईटीएफ(Gold ETF) बद्दल जाणून घेऊया.

गोल्ड ईटीएफ(Gold ETF) यामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ईटीएफ चा समावेश होतो. हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरातील चढ उताराप्रमाणे यांची किमत बदलत असते. सोने हे एक आंतरराष्ट्रीय चलनाप्रमाणे आहे. ते सर्वत्र खरेदी केले तसेच विकले जाते. 1 जानेवारी 2010 ला सोने 16650 रुपये प्रती ग्राम होते. तर आता ते जवळपास 50000 हजारांच्या आसपास आहे. म्हणजे 10-11 वर्षात सोन्यातील गुंतवणूक जवळपास तिप्पट झाली आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक हि एक महत्त्वाची गुंतवणूक मानली जाते.

गोल्ड ईटीएफ(Gold ETF) कसा खरेदी करावा?

गोल्ड ईटीएफ(Gold ETF) खरेदी करण्यासाठी तुमचे Demat खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ब्रोकर कडून Demat खाते Open करू शकता. जर तुमचे Demat खाते नसेल तर तुम्ही ते येथे उघडू शकता.

जेव्हा आपण सोने हे ETF द्वारे खरेदी करतो तेव्हा ते एखाद्या शेअर प्रमाणे खरेदी करणाऱ्याच्या Demat खात्यात जमा होते. म्हणजेच त्या ETF चे units हे Demat खात्यात जमा होतात. जरी आपण ETF खरेदी करत असलो तरी ज्या कंपनीचे आपण ETF खरेदी करतो त्या कंपनीला (AMC) ला त्या किमतीचे सोने खरेदी करावे लागते. हे सोने हे 99.5% शुद्ध असते.
सोन्यातील गुंतवणूक हि एक सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. कोणत्याही पोर्टफोलियो मध्ये सोन्याचे 10 ते 20 टक्के असणे योग्य समजले जाते.

गोल्ड ईटीएफ(Gold ETF) Vs सॉव्हरिन गोल्ड बाँड Sovereign Gold Bond (SGB)

Sovereign Gold Bond (SGB) मध्ये कमीत कमी 1 ग्राम सोने खरेदी करावे लागते गोल्ड ईटीएफमध्ये तशी काही अट नाही.
तसेच SGB मध्ये सोने 5 वर्षे पेक्षा जास्त कालावधी साठी ठेवावे लागते.
परंतु SGB मध्ये एकूण गुंतवणुकीच्या रकमेच्या 2.5% वार्षिक व्याज मिळते.

गोल्ड ईटीएफ(Gold ETF) मध्ये गुंतवणुकीचे फायदे:-

1. गोल्ड ईटीएफ चे units हे डायरेक्ट demat खात्यात जमा होत असल्याने ते साठवण्याची जोखीम राहत नाही. 2. गोल्ड ईटीएफ चे यूनिट आपण पाहिजे तितके खरेदी करू शकतो. तसेच यात SIP देखील होऊ शकते. छोट्या छोट्या units मध्ये याची खरेदी करता येते. यात 40-50 रुपयांपासून आपण पैसे गुंतवू शकतो. 3. गोल्ड ईटीएफ द्वारे घेतलेले सोने आपण मार्केट सुरू असलेल्या दिवशी खरेदी विक्री करू शकतो. जर विक्री केले असेल तर लगेच त्याचे पैसे खात्यात जमा होतात. 4. गोल्ड ईटीएफ द्वारे घेतलेले सोने हे 99.5% शुद्ध असते तसेच त्याचा भाव हा संपूर्ण भारतभर एकच असतो. त्यामुळे त्यात फसवणुकीला वाव नसतो. 5. हे सोने खरेदी करताना कोणतीही घडणावळ म्हणजेच मजुरी द्यावी लागत नाही तसेच खरेदी चा टॅक्स लागत नाही. हे विक्री करताना वजनात घट होत नाही तसेच खराब होणे,तुटणे अशा जोखीम राहत नाहीत

गोल्ड ईटीएफ(Gold ETF) मध्ये गुंतवणुकीचे तोटे:-

  1. जर तुम्हाला एखादा गोल्ड ETF यूनिट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तो ब्रोकर कडून खरेदी करावा लागतो तसेच त्यासाठी तुमचे demat खाते असणे गरजेचे असते.(जर तुमचे खाते नसेल तर तुम्ही येथे उघडू शकता.)
  2. ETF व्यवस्थापन करणारी कंपनी(AMC) व्यवस्थापनाचे पैसे आकारते.
  3. गोल्ड ईटीएफ मध्ये SGB प्रमाणे एकूण गुंतवणुकीच्या रकमेच्या 2.5% वार्षिक व्याज मिळत नाही.

काही महत्वाचे गोल्ड ईटीएफ(Gold ETF)

SYMBOL
NAV
 17-Feb-2021
GOLDBEES40.66
HDFCMFGETF4,156.68
SETFGOLD4,160.65
KOTAKGOLD405.46
GOLDSHARE4,070.16
source-www.nseindia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *