Nifty IT Index ETF-निफ्टी आयटी इंडेक्स ईटीएफ मराठी

या लेखात आपण Nifty IT Index ETF-निफ्टी आयटी इंडेक्स ईटीएफ बद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला ETF म्हणजे काय हे माहिती नसेल तर तुम्ही ते येथे वाचू शकता. ETF म्हणजे काय? ETF मधील गुंतवणुकीचे महत्व? 

निफ्टी आयटी ईटीएफ(Nifty IT ETF) बद्दल जाणून घेण्याआधी निफ्टी आयटी इंडेक्स(Nifty IT Index) बद्दल जाणून घेऊया. Nifty IT Index हा निफ्टी,सेंसेक्स सारखा एक इंडेक्स आहे. Nifty IT Index हा भारतातील आयटी(IT) कंपन्यांच्या कामगिरी बद्दल माहिती दर्शवतो. निफ्टी 50 मध्ये जशा भारतातील सर्वात मोठ्या 50 कंपन्यांचा समावेश होतो तसाच निफ्टी आयटी इंडेक्स मध्ये भारतातील महत्त्वाच्या 10 आयटी कंपन्यांचा समावेश होतो.

ह्या सर्व कंपन्यांचे इंडेक्स मध्ये वेटेज(weightage) वेगवेगळे असते. जेवढा फ्री float मार्केट capitalization जास्त तेवढे त्या कंपनीचे वेटेज जास्त. निफ्टी आयटी इंडेक्स मधील कंपन्यांचे जानेवारी 2021 मधील वेटेज खालीलप्रमाणे.

Top constituents by weightage Company’s Name Weight(%)
Tata Consultancy Services Ltd. -27.47
Infosys Ltd. -25.75
Wipro Ltd. -9.88
Tech Mahindra Ltd. -9.17
HCL Technologies Ltd. -8.98

source- nseindia.com

Nifty IT Index ने आतापर्यंत 24% वार्षिक परतावा दिला आहे(जेव्हापासून निर्देशांक नोंदवला आहे-1996) जो की अत्यंत उत्तम असा परतावा आहे. त्यामुळेच अशा महत्त्वाच्या इंडेक्स मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तर या इंडेक्स मध्ये आपण कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतो ते म्हणजे इंडेक्स फंड(Index Fund) किंवा ईटीएफ(ETF).
येथे आपण Nifty IT ETF बघूया.

आतापर्यंत लिस्ट असलेले 3 महत्त्वाचे Nifty IT ETF आणि त्यांची NAV जेव्हा Nifty IT इंडेक्स 25502 होता.

SymbolNAV 19 Feb 2021
NETFIT25.78
ICICITECH256.57
SBIETFIT257.41
source-nseindia.com

वरील ईटीएफ(ETF) ची NAV ही Nifty IT Index ला follow करते. जसे Nifty IT Index 19 फेब्रुवारी ला 25502 ला बंद झाला आणि ETF ची NAV वरील टेबल मध्ये दिल्याप्रमाणे होती. हे NAV ची किंमत एखाद्या स्टॉक प्रमाणे खरेदी विक्री केली जाते.

कंपन्यांचे(स्टॉक्स) वेटेज त्यांच्या किमती प्रमाणे थोडेफार कमी जास्त होत राहते. या ETF मध्ये वेगवेगळ्या(Diversified) कंपन्यांचे स्टॉक असल्याने जोखीम कमी असते. जर जास्त वेटेज असणाऱ्या कंपनी ने चांगला परतावा दिला तर एकूण परतावा चांगला मिळतो. तसेच कमी वेटेज असणाऱ्या कंपन्यांनी चांगला परतावा दिला नाही तरी एकूण परताव्यावर जास्त फरक पडत नाही. म्हणजेच कमी वेटेज असणाऱ्या स्टॉक्स चा परताव्यावर जास्त प्रभाव नाही. परंतु कमी वेटेज स्टॉक्स नि जरी चांगला परतावा दिला तरी एकूण ETF चा परतावा जास्त होत नाही. परतावा हा जास्त वेटेज असणाऱ्या स्टॉक्स च्या कामगिरीवर अवलंबून असतो.

ETF चा म्युच्युअल फंड(mutual fund) पेक्षा खर्च (expense ratio) कमी असतो. ETF मध्ये स्टॉक्स च्या वेटेज प्रमाणे गुंतवणूक केली जाते त्यामुळे यात जोखीम कमी असते. ETF हे एखाद्या स्टॉक प्रमाणे खरेदी व विक्री केले जातात त्यामुळे तेथे minimum investment ची सक्ती नसते. अगदी 25 रुपयांपासून आपण ETF खरेदी करू शकतो. तसेच येथे exit load नसतो. म्हणून दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक फायदेशीर गुंतवणूक ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *