डोजी(Doji) कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि त्याचे प्रकार

या लेखात आपण डोजी(Doji) कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि त्याचे काही प्रकार पाहणार आहोत. कॅन्डलस्टिक पॅटर्न चे दोन प्रकार पडतात. एका कॅन्डलस्टिक वरून तयार झालेले सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न(single candlestick pattern) आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक कॅन्डल पासून तयार झालेले मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न(multiple candlestick pattern). हे प्रकार पाहताना आपण प्रामुख्याने 1 दिवसाच्या कॅन्डल चा वापर करणार आहोत जेणेकरून सर्व पॅटर्न सहजपणे लक्षात येतील. जर तुम्हाला कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न बद्दल माहिती नसेल तर तुम्ही याधीचे कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट काय असतात? आणि कॅन्डलस्टिक(Candlestick) चार्ट कसा वाचायचा? हे दोन्ही लेख वाचू शकता.

आता आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहुयात.

डोजी(Doji) – ही एक महत्त्वाची कॅन्डल आहे. या कॅन्डल ला बॉडी नसते नुसते shadow किंवा वीक असते. मार्केट जिथे open झाले तिथेच बंद झाले. तेव्हा ही कॅन्डल तयार होते. ही कॅन्डल मार्केट मधील सहभागी लोकांचा संभ्रम दर्शवते. मार्केट एखाद्या दिवशी सुरू झाले बुल्स नि मार्केट ला वर नेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बेअर्स नी पुन्हा मार्केट खाली नेले आणि तेथे कोणाचीही सरशी न होता मार्केट जेथे ओपेन झाले होते तेथेच बंद झाले.

Doji candle example
Doji candle example

परंतु अशी परिपूर्ण डोजी कॅन्डल तयार होतेच असे नाही म्हणून कॅन्डल च्या बॉडी ची रेंज एकूण कॅन्डल च्या रेंज च्या 8 ते 10 % पर्यन्त असली तरी चालते. उदाहरणार्थ समजा एखाद्या दिवशी निफ्टी 14440 ला open झाली आणि त्या दिवशी चा high 14500 होता आणि low 14400 होता व निफ्टी 14448 ला बंद झाला तरी त्या दिवसाची कॅन्डल आपण डोजी कॅन्डल म्हणू शकतो.डोजी(Doji) कॅन्डल जर uptrend मध्ये तयार झाली तर ती ट्रेंड बदलाचे संकेत समजले जाते. म्हणजे uptrend संपून downtrend सुरू होईल असे सुचवते.

डोजी कॅन्डल चे तीच्या आकारा नुसार वेगवेगळे प्रकार पडतात. ते खाली दिलेल्या इमेज मध्ये दाखवले आहे.

dragonfly hanging man rickshaw doji
dragonfly hanging man rickshaw doji

A. Gravestone Doji ग्रेव स्टोन डोजी- यामध्ये मार्केट open झाल्यावर बुल्स नि मार्केट/stock वर नेण्याचा प्रयत्न केला पण बेअर्स नि तो खाली आणला याचा अर्थ येथे बेअर्स ची ताकत जास्त आहे. जर अशा प्रकारची कॅन्डल जर uptrend मध्ये तयार झाली तर तो ट्रेंड बदल असल्याचा सिग्नल असतो.

B. Dragonfly Doji ड्रॅगन फ्लाय डोजी- ही कॅन्डल ग्रेवस्टोन डोजी च्या विरुद्ध असते. ही कॅन्डल जर downtrend मध्ये तयार झाली तर ती ट्रेंड बदलाचे संकेत समजले जाते

C. Rickshaw Doji रिक्षा डोजी – या डोजी कॅन्डल ची रेंज खूप मोठी असते. ही मार्केट participants मधील संभ्रम(indecision) दर्शवते.

डोजीDoji कॅन्डलस्टिक पॅटर्न वरून ट्रेड कसा घ्यायचा-

एका डोजी कॅन्डल पासून आणखी काही महत्त्वाच्या कॅन्डल तयार होतात ज्या मार्केट च्या ट्रेंड reversal ची माहिती मिळवण्यासाठी आवश्यक असतात. हे पॅटर्न म्हणजे मॉर्निंग डोजी स्टार आणि ईवनिंग डोजी स्टार जे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *