शेअर बाजारातील कामकाज कसे चालते?

या लेखात आपण शेअर बाजारातील कामकाज कसे चालते याची माहिती घेणार आहोत. तसेच शेअर मार्केट मध्ये एक्स्चेंज शिवाय अजून कोणत्या संस्था काम करतात हेसुद्धा पाहणार आहोत. समजा तुम्हाला रिलायन्स चे शेअर खरेदी करायचे आहेत तर ते तुम्ही कसे खरेदी कराल. जसे आपल्याला एखादी वस्तु खरेदी कायची असेल तर आपण त्या वस्तूच्या बाजारातून ती वस्तु खरेदी करू शकतो. तसेच आपण शेअर बाजारात शेअर खरेदी करू शकतो. पण शेअर बाजारात खरेदी करायला तुम्हाला स्वतःला तेथे जावे लागत नाही तुम्ही तुमच्याकडील मोबाइल कॉम्प्युटर द्वारे इंटरनेट च्या सहाय्याने खरेदी करू शकता.

भारतातील शेअर बाजार

भारतात National Stock Exchange(NSE) म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजार आणि Bombay Stock Exchange(BSE) म्हणजेच मुंबई शेअर बाजार असे दोन महत्त्वाचे शेअर बाजार आहेत. येथे शेअर ची खरेदी विक्री केली जाते. त्यासाठी तुम्ही NSE Vs BSE कुठे खरेदी करू? हा लेख वाचू शकता. पण तुम्ही तेथे स्वतः जाऊन खरेदी विक्री करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला स्टॉक ब्रोकर(Stock Broker) ची गरज भासते. स्टॉक ब्रोकर हा तुमच्यातर्फे खरेदी आणि विक्री चे व्यवहार करतो.

शेअर म्हणजे नक्की काय असतो? Demat म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही एकदम थोड्या प्रमाणात का होईना सहमालक बनत असता. 2000 सालापूर्वी शेअर हे कागदी दस्तावेजच्या स्वरूपात मिळत असत पण आता ते डिजिटल स्वरूपात मिळतात. या स्वरूपाला Dematerialzed म्हणजेच थोडक्यात Demat स्वरूपातील शेअर म्हणतात. जर तुम्हाला शेअर खरेदी करायचा असेल तर तुमचे Demat खाते असणे आवश्यक आहे. जर तुमचे नसेल तर तुम्ही ते येथे उघडू शकता. Demat खात्यात तुमचे शेअर हे सुरक्षितपणे जतन केले जातात.

शेअर जतन करणाऱ्या संस्था

आपल्या देशात दोन कंपन्या NSDL- National Securities Depository Limited CDSL- Central Depository Services (India) Limited Demat सोयी पुरवतात. पण तुम्ही येथे डायरेक्ट अप्लाय करू शकता नाही. जेव्हा तुम्ही स्टॉक ब्रोकर कडे खाते उघडण्यासाठी अर्ज करता तेव्हा तुमचं ब्रोकर Depository Participant(DP) च्या साहाय्याने तुमचे Demat खाते उघडतो. Depository Participant(DP) तुमच्या Demat खात्यातील शेअर चे खरेदी विक्री चे व्यवहार पाहतो. उदाहरणार्थ तुम्ही रिलायन्स चा शेअर खरेदी केला तर तो तुमच्या ब्रोकर द्वारे खरेदी केला जाईल आणि DP मार्फत तो तुमच्या Demat खात्यात जमा केला जाईल. तसेच जर तुम्ही तो शेअर विकला तर DP मार्फत तो शेअर तुमच्या खात्यातून डेबिट केला जाईल आणि ब्रोकर मार्फत विकला जाईल.

या लेखात आपण शेअर बाजारातील कामकाज कसे चालते हे पहिले. अर्थात हे सर्व व्यवहार मागे(Backend) ला होतात. आपल्याला फक्त ब्रोकर च्या वेबसाइट वा टर्मिनल वर जाऊन शेअर ची खरेदी विक्री करायची असते. बाकीचे कार्य त्या संस्था कडून आपोआप पर पाडले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *