FII Investment marathi शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारात FII/FPI investment (Foreign Institutional Investor/Foreign Portfolio Investors) म्हणजेच परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक ही अत्यंत महत्वाची आहे. परकीय गुंतवणूकदार हे विविध देशांमध्ये गुंतवणूक करत असतात. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था व परिणामे उद्योगांच्या वाढीवर त्यांचा जास्त विश्वास असतो त्या देशांमध्ये ते गुंतवणूक करायला प्राधान्य देतात. तसेच ही गुंतवणूक त्यांच्या द्वारे मोठ्या प्रमाणावर केली जाते. बऱ्याच वेळा भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक Nifty आणि Sensex हे FII च्या खरेदी विक्री प्रमाणे वर खाली होतात. म्हणजेच FII ची भूमिका भारतीय शेअर बाजाराचा कल दर्शवते. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेताना परकीय गुंतवणूक कशी आहे हे समजून घ्यावे.
भारतातील काही मोठ्या कंपन्यांमध्ये परकीय गुंतवणुकीची टक्केवारी ही 50% पेक्षा जास्त आहे. जसे HDFC, ZEE Entertainment, Axis Bank इत्यादी

FII/FPI चा शेअर मार्केट वरील प्रभाव

FII/FPI म्हणजेच परकीय गुंतवणूकदार रोज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेअर ची खरेदी विक्री करत असतात. दर् दिवशी ते सुमारे 5000-10000 कोटी रुपयांची खरेदी तसेच विक्री करतात. जेव्हा त्यांची खरेदी ही विक्री पेक्षा जास्त असते तेव्हा मार्केट हे वर जाते.(80% शक्यता) आणि जेव्हा त्यांची विक्री खरेदी पेक्षा जास्त असते तेव्हा मार्केट खाली जाते.(80% शक्यता). पण त्यांची दिवसाची खरेदी विक्री जर 5000 कोटी च्या आत असेल तर त्यांचा मार्केट वर जास्त फरक पडत नाही.

FII investment चे महत्त्व

FII अशा ठिकाणी invest करतात जेथे त्यांना चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळतील. त्यामुळे ते त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचा अभ्यास करतात जसे जीडीपी, जीडीपी ग्रोथ रेट इत्यादी. जर ते त्या देशाच्या उन्नती आणि विकासावर सकारात्मक असतील तरच ते तेथे गुंतवणूक करतील. म्हणजेच FII जर आपल्या देशात invest करत आहेत तर ती आपल्यासाठी चांगली बाब आहे. म्हणून शेअर मार्केट अभ्यास करताना FII investment ची माहिती आवश्यक आहे.

FII/FPI investment ची माहिती कशी पहावी?

याची माहिती आपण NSE च्या वेबसाइट वर पाहू शकतो. ही त्याची लिंक आहे FII/FPI & DII trading activity on NSE, BSE and MSEI (nseindia.com). प्रत्येक दिवशी ची माहिती संध्याकाळी 6 नंतर येथे दिली जाते. जर तुम्हाला या माहितीचा अभ्यास करायचा असेल तर ही माहिती तुम्ही रेकॉर्ड करून ठेवू शकता. तसेच ही माहिती NSDL च्या वेबसाइट वर देखील उपलब्ध असते परंतु ही माहिती जरा उशिरा उपलब्ध होते.
जर आपल्याला सरळ व सोपी माहिती हवी असेल तर ती moneycontrol च्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. FII & DII Trading Activity in Cash, Futures and Options, MF SEBI & FII SEBI Daily Trends Stocks Data (moneycontrol.com) ह्या लिंक वर तुम्ही ती पाहू शकता. येथे प्रत्येक दिवशीची माहिती रेकॉर्ड केलेली आहे तसेच दर महिन्याला किती गुंतवणूक झाली किती विक्री झाली याची माहिती येथे सहज उपलब्ध आहे. त्यामुळे ही माहिती तुम्हाला स्वतंत्र रेकॉर्ड करून ठेवण्याची गरज नाही. ज्या महिन्याची माहिती तुम्हाला हवी आहे त्या महिन्यावर click करून ही माहिती तुम्ही पाहू शकता.

जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहाCategories – TradersKatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *