Hammer Candlestick Pattern marathi हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी

मागच्या लेखात आपण डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बद्दल माहिती घेतली. जर तुम्ही तो लेख वाचला नसेल तर त्यासाठी डोजी(Doji) कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि त्याचे प्रकार हे पाहा. या लेखात आपण अजून काही महत्त्वाचे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. हे पॅटर्न म्हणजे Hammer Candlestick Pattern हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि Hanging Man Pattern हँगिंग मॅन पॅटर्न. हे पॅटर्न reversal पॅटर्न म्हणून ओळखले जातात. कारण हे पॅटर्न आढळल्या नंतर मार्केट चा ट्रेंड बदलण्याची शक्यता असते. तुम्हाला इंट्रा डे ट्रेडिंग कसे करावे हे शिकायचे असेल तर ह्या कॅन्डल चा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. शेअर मार्केट अभ्यास करताना वरील दोन्ही प्रकारच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न चा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

Hammer Candlestick Pattern हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न

हा पॅटर्न हॅमर म्हणजेच एखाद्या हातोडी सारखा दिसतो. येथे कॅन्डल wick or shadow मोठी असते आणि मूळ बॉडी ही लहान असते. या हॅमर(hammer) पॅटर्न मध्ये कॅन्डल च्या रंगाला महत्त्व नसते. तर कॅन्डल तयार होत असताना मार्केट मधील players नी काय अॅक्टिविटी केली हे महत्त्वाचे आहे. खाली दिलेल्या इमेज मध्ये आपण हॅमर पॅटर्न पाहू शकता.

hammer or hanging man candle
hammer or hanging man candlestick pattern

हॅमर पॅटर्न हा downtrend मध्ये तयार होतो. जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि हॅमर पॅटर्न तयार झाला तर बुल्स ची मार्केट मध्ये एंट्री झाली असे समजले जाते. हे समजण्यासाठी आपण एक scenario पाहूया

Scenario- Bears(बेअर्स) मार्केट मध्ये अॅक्टिव आहेत. रोज नवीन बॉटम मार्केट मध्ये तयार होत आहेत. एके दिवशी Bears नि मार्केट खाली नेले. परंतु खरेदी च्या दबावामुळे मार्केट बंद होताना open च्या जवळच बंद झाले त्यामुळे त्या कॅन्डल ल हॅमर चा आकार आला. परफेक्ट हॅमर पॅटर्न साठी wick or shadow ही बॉडी च्या दुपटी पेक्षा थोडी जास्त असावी.

आता आपण हॅमर पॅटर्न चे उदाहरण पाहूया. यासाठी मी Nifty 50 चा 15 मिनिट चार्ट निवडला आहे. तो आपण खालील इमेज मध्ये पाहू शकता. खालील इमेज मी माझ्या ब्रोकर च्या प्लॅटफॉर्म वरून घेतली आहे

hammer candle example

Hanging Man Pattern हँगिंग मॅन पॅटर्न

हॅमर पॅटर्न जर uptrend मध्ये तयार झाला तर त्याला Hanging Man Pattern हँगिंग मॅन पॅटर्न असे म्हणतात. म्हणजे Hanging Man Pattern हा हॅमर सारखाच दिसतो परंतु तो uptrend मध्ये आढळतो. हँगिंग मॅन पॅटर्न तयार झाला तर बेअर्स ची मार्केट मध्ये एंट्री झाली असे समजले जाते. हे समजण्यासाठी आपण एक scenario पाहूया

Scenario- Bulls(बुल्स) मार्केट मध्ये अॅक्टिव आहेत. मार्केट रोज नवीन शिखरावर जात आहे. एके दिवशी Bulls नि मार्केट वर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर Bearsबेअर्स नी मार्केट कहा ताबा घेतला. मार्केट मध्ये जोरदार विक्री झाली आणि मार्केट बंद होताना bulls नी मार्केट कसेबसे वर नेले आणि ते open च्या आसपास बंद झाले. जर कोणत्या मोठ्या प्लेयर(FII or DII) नी नफा वसुली म्हणजेच profit booking केली तर अशा प्रकारचा पॅटर्न तयार होतो.

आता आपण हँगिंग मॅन पॅटर्न चे उदाहरण पाहूया. यासाठी मी Nifty 50 चा 15 मिनिट चार्ट निवडला आहे. तो आपण खालील इमेज मध्ये पाहू शकता. खालील इमेज मी माझ्या ब्रोकर च्या प्लॅटफॉर्म वरून घेतली आहे

Hanging man pattern
Hanging man pattern

वरील इमेज मध्ये आपण हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि हँगिंग मॅन पॅटर्न हे दोन्ही पाहू शकता. इंट्रा डे ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही वरील दोन्ही पॅटर्न वापरू शकता.

जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहा – Categories – TradersKatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *