Marubozu कॅन्डलस्टिक काय असते??? Marubozu कॅन्डलस्टिक पॅटर्न Marubozu candlestick pattern in marathi | candlestick pattern marathi मराठी

Marubozu कॅन्डलस्टिक काय असते? (Marubozu candlestick pattern in marathi) हे आपण येथे पाहणार आहोत. तसेच तुम्ही वरील यूट्यूब विडियो सुद्धा पाहू शकता. या कॅन्डल मध्ये संपूर्ण कॅन्डल ही बॉडी ने बनलेली असते म्हणजेच त्याला wick अथवा shadow नसते. या कॅन्डल मध्ये थोडीशी wick असली तरी चालते. या कॅन्डल चे 2 प्रकार पडतात.
1.Bullish Marubozu(तेजी मारूबोजू )
2.Bearish Marubozu (मंदी मारूबोजू )

1.Bullish Marubozu(तेजी मारूबोजू )

ही कॅन्डल आपण इमेज मध्ये पाहू शकतो. या कॅन्डल ज्या वेळेला तयार झाली (1 दिवस) त्याचा आपण scenario समजून घेऊया. एखाद्या दिवशी मार्केट ओपन झाले त्यानंतर बुल्स नी (तेजीवले) मार्केट चा ताबा घेतला आणि दिवसाच्या शेवटी मार्केट high ला बंद झाले. या कॅन्डल मध्ये बुल्स ची एकूण मार्केट मधील ताकत दिसून येते. ही कॅन्डल येणाऱ्या काळात चालू राहणाऱ्या तेजीचे uptrend चे संकेत असते.

Bullish Marubozu

Bearish Marubozu (मंदी मारूबोजू)

ही कॅन्डल आपण इमेज मध्ये पाहू शकतो. ही कॅन्डल ओपन=हाय (open=high) आणि क्लोज=लो(close=low) या प्रकारची असते. या कॅन्डल ज्या वेळेला तयार झाली (1 दिवस) त्याचा आपण scenario समजून घेऊया. एखाद्या दिवशी मार्केट ओपन झाले त्यानंतर बेअर्स नी (मंदिवाले मार्केट चा ताबा घेतला आणि दिवसाच्या शेवटी मार्केट एकदम low ला बंद झाले. या कॅन्डल मध्ये बेअर्स ची एकूण मार्केट मधील ताकत दिसून येते. ही कॅन्डल येणाऱ्या काळात चालू राहणाऱ्या मंदी चे downtrend चे संकेत असते.

Bearish Marubozu

अधिक माहिती साठी वरील youtube विडियो पाहा Marubozu candlestick pattern in marathi. आपल्या चॅनल ला subscribe करा.

जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहा – Categories – TradersKatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *