DP चार्जेस काय असतात? DP charges in marathi |Hidden charges in share market

जेव्हा आपण आपल्या डिमॅट खात्यातून शेअर विकतो तेव्हा DP charges(Depository Participant charges) लागू होतात. डिपॉझिटरी Depository आणि डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट Depository Participant यांच्या द्वारे डीपी शुल्क आकारले जाते. डिपॉझिटरी Depository मध्ये NSDL(National Securities Depository Limited) आणि CDSL (Central Depository Services Limited) यांचा समावेश होतो. तर डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट Depository Participant मध्ये तुमच्या ब्रोकर चा समावेश होतो जसे Zerodha, Upstox, Angel Broking

DP चार्जेस कधी लागतात?

आपल्या होल्डिंगमधून विक्री केलेल्या समभागांसाठी ज्या दिवशी आपण आपली विक्री ऑर्डर द्याल त्या दिवशी तुम्हाला DP charges द्यावे लागतात. शेअर खरेदी करताना DP charges आकारले जात नाही. CDSL द्वारे Rs 5.5 तर NSDL द्वारे Rs 15 शुल्क आकारले जाते. एकूण शुल्क हे (CDSL+ Depository Participant) चे असते.

उदाहरणार्थ(DP Charge example):
Zerodha द्वारे 13.5+GST शुल्क आकारले जाते. त्यात 8 रुपये DP Depository Participant Zerodha व 5.5 रुपये CDSL चा समावेश होतो.
तसेच Upstox द्वारे 18.5+GST शुल्क आकारले जाते आणि Angel Brokingद्वारे 20+GST शुल्क आकारले जाते. तुम्ही तुमच्या ब्रोकर च्या वेबसाइट वर ते शुल्क पाहू शकता.
जे discount ब्रोकर्स फ्री delivery शुल्क आकारतात त्याचा हा उत्पन्नाचा स्त्रोत असतो.(Discount broker charges in marathi)

जर आपण सकाळी रिलायन्स चे 50 शेअर्स आणि दुपारी रिलायन्सचेच 50 शेअर्स विकले तर त्या स्क्रिपसाठी (स्टॉक) दिवसाचे एकूण लागू डीपी शुल्क रू. 13.5 + 18% जीएसटी. हे शुल्क शेअर वर आकारले जाते त्यामुळे तुम्ही 1 विकला अथवा 100 विकले शुल्क तेवढेच असते.(dp charges for one stock and multiples stocks) परंतु जर तुम्ही सकाळी रिलायन्स चे शेअर्स आणि दुपारी इन्फोसिस चे शेअर्स विकले तर तुम्हाला अजून एकदा 2 वेगळ्या स्टॉक्स चे मिळून दिवसाचे एकूण लागू डीपी शुल्क रू. 13.5*2=27 + 18% जीएसटी द्यावा लागेल. upstox साठी हे 18.5 + 18% जीएसटी रुपये असेल.

इंटरा डे(intraday) साठी DP शुल्क आकारले जात नाही.

शेअर विकताना इतर अजूनही charges लागतात परंतु ते तुमच्या transaction च्या value वर अवलंबून असतात. परंतु DP शुल्क शेअर वर आकारले जाते त्यामुळे तुम्ही 1 विकला अथवा 100 विकले शुल्क तेवढेच असते.

जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहा – Categories – TradersKatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *