बँक निफ्टी मध्ये कशी गुंतवणूक करू? Invest in Banknifty

बँक निफ्टी मध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे? Invest in Banknifty बरेच जण हे बँक निफ्टी च्या ऑप्शन option मध्ये ट्रेड करत असतात. ट्रेडमध्ये पैसे लॉस loss होण्याची शक्यता खूप जास्त असते कारण बँक निफ्टी इंडेक्स खूप जास्त volatile असतो. यातील ऑप्शन्स option च्या किमती क्षणार्धात एकदम वाढतात तर एकदम कमी होतात. तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो कि या बँक निफ्टी मध्ये ट्रेड घेण्यापेक्षा गुंतवणूक केलेली बरी. कारण गुंतवणूक केल्यामुळे आपला पैसा तरी सुरक्षित राहतो.

बँक निफ्टी मध्ये पैसे सुरक्षित राहतात कारण याला ऑप्शन ट्रेडिंग प्रमाणे एक्सपायरी डेट नसते. एक्सपायरी डे ला ऑप्शन वर्थलेस एक्सपायर(worthless expire) होण्याची शक्यता जास्त असते. कारण मार्केट ऑपरेटर्स हे सामान्य ट्रेडर ला सहजासहजी पैसे मिळवून देत नाही.

बँक निफ्टी मध्ये गुंतवणूक Bank Nifty Investment

तर या बँक निफ्टी मध्ये गुंतवणूक कशी करावी तर यासाठी बँक निफ्टी ईटीएफ Bank Nifty ETF मध्ये पैसे गुंतवावेत. जर तुम्हाला ETF माहीत नसेल तर ETF म्हणजे काय? ETF मधील गुंतवणुकीचे महत्व? हा लेख वाचावा. बँक निफ्टी ईटीएफ Bank Nifty ETF हा त्याचा benchmark index निफ्टी बँक Nifty Bank यांना फॉलो करतो. बँक निफ्टी निर्देशांक हा सध्या 38000 आहे याचा महत्त्वाचा ईटीएफ बँक बीज BANKBEES ची एन ए व्ही NAV 380 च्या आसपास आहे. जेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 30000 च्या आसपास जाईल तेव्हा याची NAV ही 300 तीनशेच्या आसपास होईल तसेच जर हा निर्देशांक 40000 पर्यंत गेला तर याची NAV ही 400 पर्यंत जाईल.

बँक निफ्टी निर्देशांक शेअर Nifty Bank Index Constituents

बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देशातील महत्त्वाच्या 10 बँकांचा समावेश होतो. यातील मोठ्या बँकांची कॅपिटल प्रमाणे वेटेज हे जास्त असते हे आपण खालचा चार्ट मध्ये पाहू शकता. हे weightage प्रत्येक दिवशी बदलत असते. खालील वेटेज ऑक्टोबर महिन्यातील आहे.

टॉप 10 बँक निफ्टी शेअर

बँक निफ्टी ईटीएफ फायदे Bank Nifty ETF benefits

जेव्हा आपण इंडेक्समध्ये द्वारे गुंतवणूक करतो तेव्हा आपण देशातील सर्वोत्तम बँकांमध्ये गुंतवणूक करत असतो. बँक निफ्टी इंडेक्स आतापर्यंत वार्षिक 19% परतावा return दिलेला आहे. जेव्हा पासून हा निर्देशांक स्थापित करण्यात आलेला आहे. वीस वर्षांसाठी कोणत्याही एखाद्या म्यूचुअल फंड(mutual fund) ला पण एवढा रिटर्न return मिळवणे सहज शक्य नाही. हे खालील इमेज मध्ये दाखवलेला आहे.

Banknifty return since inception

बँक निफ्टी ईटीएफ Bank Nifty ETF द्वारे वेगवेगळ्या बँकांमध्ये गुंतवणूक होत असल्यामुळे ती गुंतवणूक डायव्हर्सिफाईड diversified राहते. म्हणजे एखाद्या बँकेच्या स्टॉक stock ने कमी परतावा return दिला तरी एकूण परताव्यावर त्याचा फारसा फरक पडत नाही. उदाहरणार्थ येस बँक yes bank बँक निफ्टी इंडेक्स चा भाग होता याचा share एकेकाळी तीनशे ते साडेतीनशे च्या दरम्यान होता. तो आता दहा ते वीस च्या दरम्यान असतो म्हणजेच या स्टॉप ने खूप वजा रिटर्न दिला आहे म्हणजे एकदम निगेटिव्ह मध्ये. परंतु निर्देशांकात त्याचा काहीही फरक पडलेला नाही. जसा हा स्टॉक खाली खाली गेला तसा हा त्या निर्देशांक आतून बाहेर पडला. म्हणजेच या निर्देशांकात चांगल्या परफॉर्म करणार आहे अशाच शेअर्स चा समावेश होतो(best performing stocks of banknifty).

या निर्देशांकात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही इंडेक्स फंड index fund देखील वापर करू शकता परंतु याचा खर्च expense ratio हा ETF पेक्षा जास्त असतो.

बँक निफ्टी ईटीएफ गुंतवणुकीचे तोटे

बँक निफ्टी index बरेच वर्ष एखाद्या रेंजमध्ये राहिला तर त्याचा रिटर्न हा कमी होण्याची शक्यता असते. बँक निफ्टी index वाढण्यासाठी त्यातील heavyweight stocks स्टोक्स चांगले परफॉर्म करणे आवश्यक ठरते. जर एखाद्या low weightage स्टॉक ने चांगला रिटन दिला तरी निर्देशांकात त्याचा जास्त फरक पडत नाही. जर तुम्ही निर्देशांक टॉप वर असताना त्यात गुंतवणूक केली आणि निर्देशांक खाली आला तर त्याचा परतावा वजा होण्याची शक्यता असते.

बँक निफ्टी ईटीएफ कोणी गुंतवणूक करावी

ज्यांनी बँक निफ्टी च्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड केलेले आहे परंतु त्यात त्यांना नुकसान झालेले आहे त्यांनी यात गुंतवणूक करणे चांगले कारण तुमचे पैसे येथे सुरक्षित आहेत ते कधी ना कधी वाढणारच आहे. जे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात म्हणजेच इन्व्हेस्ट आणि फॉरगेट invest and forget तसेच जे एसआयपी sip सिप द्वारे गुंतवणूक करतात तसेच जे नवीन गुंतवणूकदार आहेत ज्यांना गुंतवणूक कशी करायची हे माहित नाही त्यांनी अशा प्रकारच्या ईटीएफ मध्ये गुंतवणूक करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *