सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय? Sensex and nifty difference in marathi

या लेखामध्ये आपण सेन्सेक्स Sensex आणि निफ्टी Nifty मध्ये काय फरक आहे sensex vs nifty हे पाहणार आहोत. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही बेंचमार्क इंडेक्स benchmark index आहेत. हे दोन्ही भारतातील सर्वात मोठे इंडेक्स आहेत. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज Bombay Stock Exchange of India म्हणजेच बीएससी BSE चा मुख्य इंडेक्स index म्हणजेच निर्देशांक आहे तर निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज National Stock Exchange म्हणजेच NSE चा मुख्य निर्देशांक आहे.

निर्देशांकांची गरज Use of nifty and sensex

प्रत्येक देशात हजारो कंपन्या सूचीबद्ध listed असतात परंतु देशाची अर्थव्यवस्था Economy अथवा प्रगती कशी आहे हे समजण्यासाठी सर्व कंपन्यांचे मूल्यांकन track all company करणे अवघड जाते त्यामुळे त्या देशातील सर्वोत्तम 30, 50, 100 किंवा त्या देशातील शेअर बाजारांना योग्य वाटेल इतक्या कंपन्यांचा मिळून एक निर्देशांक बनवला जातो. त्याद्वारे अख्या देशाची अथवा अर्थव्यवस्थेची अभ्यास करणे किंवा परफॉर्मन्स कसा आहे हे समजणे सोपे जाते. उदारणार्थ-Nifty, S&P 500, Nasdaq 100

उदारणार्थ एन एस सी NSE वर सतराशे पेक्षा जास्त कंपन्या सूचीबद्ध आहेत. परंतु प्रत्येक कंपन्यांचे मूल्यांकन करून त्या निर्देशांकात आणणे हे तसे अवघड काम आहे आणि एखादी कंपनी अतिशय छोटी असली तर तिथं तिचा निर्देशांकावर फारसा फरक पडत नाही. शेअर बाजारांना योग्य वाटेल इतक्या कंपन्यांचा मिळून एक निर्देशांक बनवला जातो त्यामुळे सेन्सेक्स निफ्टी अशा निर्देशांकांचा वापर केला जातो.

सेन्सेक्स म्हणजे काय? Sensex in marathi

सेन्सेक्स म्हणजेच सेन्सिटिव्ह इंडेक्स Sensitive Index हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारे कॅल्क्युलेट केला जाणारा निर्देशांक आहे. यामध्ये भारतातील सर्वोत्तम 30 कंपन्यांचा समावेश होतो. सेन्सेक्स हा निफ्टी पेक्षा जुना निर्देशांक आहे आणि त्याचे मूळ व्हॅल्यू हि 100 आहे आणि त्याचे वर्ष 1978 आहे. तर दर सहा महिन्याला सेन्सेक्स मधील तीस शेअर्स चा परफॉर्मन्स पाहून ते शेअर्स जर त्या निकषात बसत नसतील तर ते सेन्सेक्स मधून बाहेर पडतात आणि त्याची जागा इतर शेअर्स घेतात Sensex rejig. उदाहरणार्थ एस बँक Yes Bank चा शेअर हा सेन्सेक्स चा भाग होता परंतु त्यानंतर तो सेन्सेक्स मधून बाजूला गेला आणि त्याची जागा दुसऱ्या शेअर ने घेतली. सध्या हा निर्देशांक 55000 ते 60000 च्या दरम्यान आहे.

निफ्टी म्हणजे काय? Nifty in marathi

निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज फिफ्टी आणि हा एन एस सी NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा बेंचमार्क इंडेक्स आहे यामध्ये देशातील सर्वोत्तम 50 कंपन्यांचा समावेश होतो. या इंडेक्स मध्ये असलेल्या कंपन्यांच दर सहा महिन्यांना परफॉर्मन्स चेक केला जातो. ज्या कंपन्या अंडर फॉर्म under perform करतात त्या या इंडेक्स मधून बाहेर पडतात nifty rejig. उदाहरणार्थ इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स कंपनी तसेच लुपिन या निफ्टी फिफ्टी चा भाग होत्या. त्यांची जागा हि इतर कंपन्यांनी घेतली. निफ्टी ची बेस् व्हॅल्यू ही 1000 आहे आणि बेस वर्ष हे 1996 आहे. सध्या हा निर्देशांक 17000 ते 18000 च्या दरम्यान आहे.

तसे पहिले तर दोन्ही निर्देशांक मध्ये जवळ जवळ सारख्याच कंपन्यांचा समावेश होतो. परंतु सेंसेक्स मध्ये भारतातील सर्वोत्तम 30 कंपन्यांचा समावेश होतो म्हणून हा निर्देशांक जास्त selective असतो. 

नवीन शेअर घेताना NSE वर खरेदी करायचा कि BSE वर? जर तुम्ही शेअर बाजारात नवीन असाल तर हा प्रश्न तुम्हाला हमखास पडला असेल. जाणून घ्या NSE Vs BSE कुठे खरेदी करू?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *