पेमेंट बँक आणि कमर्शियल बँक मध्ये काय फरक आहे?

या लेखात आपण पेमेंट बँक आणि कमर्शियल बँक म्हणजे काय? Payment bank and commercial bank आणि त्यांच्यात काय फरक आहे हे पाहणार आहोत. जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहा – Categories – TradersKatta

पेमेंट बँक आणि कमर्शियल म्हणजेच नॉर्मल बँक यामध्ये काय फरक आहे? Payment bank and commercial bank difference

ठेव मर्यादा(deposit limit)-कमर्शियल बँक ग्राहकांकडून कोणत्याही रकमेची ठेवी स्वीकारू शकतात परंतु पेमेंट बँकेमध्ये प्रत्येक ग्राहकासाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये ही मर्यादा आहे.maximum deposit limit in payments bank

क्रेडिट कार्ड सुविधा(credit card facility) – कमर्शियल बँका त्यांच्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड देऊ शकतात परंतु पेमेंट्स बँक त्यांच्यासाठी त्यांच्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाहीत.

कर्ज(Loan) – कमर्शियल बँका आपल्या ग्राहकांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात परंतु पेमेंट बँकांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.

पेमेंट बँकांना त्यांच्या एकूण ठेवी पैकी 75 टक्के ठेवी ह्या सरकारी रोख्यांमध्ये गव्हर्मेंट सिक्युरिटी मध्ये गुंतवावे लागतात तर कमर्शिअल बँकांसाठी ही मर्यादा 22 टक्के आहे.

पेमेंट बँक चा उद्देश हा सर्वसमावेशक वित्तीय सहभाग वाढवणे आहे. ज्यामध्ये ते छोटे बचत खाते हे तळागाळतील लोकांपर्यंत पोचवणे अपेक्षित आहे. म्हणजेच ज्या लोकांपर्यंत बँकेची सोय पोचत नाहीत त्यांना बँक सुविधा उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये कामगार कमी उत्पन्न असलेले लोक, छोटे शेतकरी, छोटे उद्योग धंदे आणि असंघटित क्षेत्रातील लोकांचा समावेश होतो. एअरटेल पेमेंट बँक ही सर्वात पहिली पेमेंट बँक होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *