सिल्वर ईटीएफ(Silver ETF) काय आहे? Silver ETF investment in marathi

गेल्या लेखात आपण ETF म्हणजे काय? ETF मधील गुंतवणुकीचे महत्व? पाहिले. ETF म्हणजेच Exchange Traded Fund हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड आहे. जाच्या भागांची(units) खरेदी विक्री एखाद्या शेअर प्रमाणे खुल्या बाजारात होते. ETF मध्ये विविध प्रकारच्या रोखे जसे की शेअर, सोने, सरकारी रोखे यांचा समावेश होतो.या लेखात आपण सिल्वर ईटीएफ(Silver ETF) बद्दल जाणून घेऊया.

सिल्वर ईटीएफ(Silver ETF) यामध्ये चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ईटीएफ चा समावेश होतो. हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीमध्ये गुंतवणूक करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीच्या दरातील चढ उताराप्रमाणे यांची किमत बदलत असते. सोने हे एक आंतरराष्ट्रीय चलनाप्रमाणे आहे. ते सर्वत्र खरेदी केले तसेच विकले जाते. तसाच चांदी हा सुद्धा महत्वाचा धातू आहे. त्यामुळे यातील गुंतवणुकीचा अभ्यास महत्वाचा आहे.

सिल्वर ईटीएफ(Silver ETF) कसा खरेदी करावा? How to buy silver etf?

सिल्वर ईटीएफ(Silver ETF) खरेदी करण्यासाठी तुमचे Demat खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ब्रोकर कडून Demat खाते Open करू शकता. जर तुमचे Demat खाते नसेल तर तुम्ही ते येथे उघडू शकता.

जेव्हा आपण चांदी हे ETF द्वारे खरेदी करतो तेव्हा ते एखाद्या शेअर प्रमाणे खरेदी करणाऱ्याच्या Demat खात्यात जमा होते. म्हणजेच त्या ETF चे units हे Demat खात्यात जमा होतात. जरी आपण ETF खरेदी करत असलो तरी ज्या कंपनीचे आपण ETF खरेदी करतो त्या कंपनीला (AMC) ला त्या किमतीचे चांदी खरेदी करावे लागते.

सिल्वर ईटीएफ(Silver ETF) गुंतवणुकीचे फायदे(benefits of investing in silver etf marathi):-

1. सिल्वर ईटीएफ चे units हे डायरेक्ट demat खात्यात जमा होत असल्याने ते साठवण्याची जोखीम राहत नाही.

2. सिल्वर ईटीएफ चे यूनिट आपण पाहिजे तितके खरेदी करू शकतो. तसेच यात SIP देखील होऊ शकते. छोट्या छोट्या units मध्ये याची खरेदी करता येते. यात 60-70 रुपयांपासून आपण पैसे गुंतवू शकतो.

3. सिल्वर ईटीएफ द्वारे घेतलेले चांदी आपण मार्केट सुरू असलेल्या दिवशी खरेदी विक्री करू शकतो. जर विक्री केले असेल तर लगेच त्याचे पैसे खात्यात जमा होतात.

4. सिल्वर ईटीएफ द्वारे घेतलेले चांदी हे 99.5% शुद्ध असते तसेच त्याचा भाव हा संपूर्ण भारतभर एकच असतो. त्यामुळे त्यात फसवणुकीला वाव नसतो.

5. हे चांदी खरेदी करताना कोणतीही घडणावळ म्हणजेच मजुरी द्यावी लागत नाही तसेच खरेदी चा टॅक्स लागत नाही. हे विक्री करताना वजनात घट होत नाही तसेच खराब होणे,तुटणे अशा जोखीम राहत नाहीत.

सिल्वर ईटीएफ(Silver ETF) मध्ये गुंतवणुकीचे तोटे (limitations of investing in silver etf):-

1.जर तुम्हाला एखादा सिल्वर ईटीएफ यूनिट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तो ब्रोकर कडून खरेदी करावा लागतो तसेच त्यासाठी तुमचे demat खाते असणे गरजेचे असते.

2.ETF व्यवस्थापन करणारी कंपनी(AMC) व्यवस्थापनाचे पैसे आकारते.

3. गेल्या काही वर्षात सिल्वर ने गोल्ड पेक्षा कमी परतावा दिला आहे.

सिल्वर ईटीएफ गुंतवणूक (Silver ETF Investment)

नुकताच निप्पॉन इंडिया Nippon India Mutual Fund ने सिल्वर ईटीएफ जारी केला आहे. त्याचा symbol NETFSILVER आहे. ICICI Prudential Asset Management Company Ltd ने सुद्धा Silver ETF Investment साठी खुला केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *