Engulfing Candlestick Pattern marathi एन्गलफिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी

या लेखात आपण अजून काही महत्त्वाचे multiple candlestick pattern म्हणजेच एकापेक्षा जास्त कॅन्डल नि तयार होणारे कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. हे पॅटर्न म्हणजे Engulfing Candlestick Pattern एन्गलफिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे पॅटर्न reversal पॅटर्न म्हणून ओळखले जातात. कारण हे पॅटर्न आढळल्या नंतर मार्केट चा ट्रेंड बदलण्याची शक्यता असते. तुम्हाला इंट्रा डे ट्रेडिंग कसे करावे हे शिकायचे असेल तर ह्या कॅन्डल चा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. शेअर मार्केट अभ्यास करताना वरील दोन्ही प्रकारच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न चा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही खालील विडियो पाहू शकता.

Engulfing Candlestick Pattern

Engulfing Candlestick Pattern Types एन्गलफिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न चे प्रकार

Engulfing Candlestick Pattern Types एन्गलफिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न चे प्रकार पुढीलप्रमाणे

  1. Bullish Engulfing Candlestick बुलिश एन्गलफिंग कॅन्डलस्टिक (तेजी)
  2. Bearish Engulfing Candlestick बेअरिश एनगालफईंग कॅन्डलस्टिक (मंदी)

Bullish Engulfing Candlestick बुलीश एनगालफईंग कॅन्डलस्टिक (तेजी)

एन्गलफिंग पॅटर्न हा एक मोठा reversal pattern पॅटर्न आहे ज्यामध्ये दोन विरुद्ध रंगीत कॅन्डल असतात. बुलिश एन्गलफिंग पॅटर्न आकृती मध्ये आहे तसा तयार होतो. मार्केट डाउनट्रेंड मध्ये असते ते मागील दिवसाच्या बंदपेक्षा कमी(low) उघडते आणि आदल्या दिवशी च्या open पेक्षा उच्च(high ला) बंद होते. अशा प्रकारे,एक ग्रीन बुलिश कॅन्डल आदल्या दिवशीची रेड कॅन्डल म्हणजेच बेअरिश कॅन्डल पूर्णपणे व्यापते. हा येणाऱ्या अपट्रेंड uptrend चा एक संकेत मानला जातो कारण येथे मार्केट मधील मंदी करणारे बेअर्स bears चा कॉन्फिडन्स तोडला जातो. मार्केट आदल्या दिवशी पेक्षा कमी low ला ओपेन झाले असले तरी जोरदार खरेदी होऊन ते high ला बंद होते.

Bearish engulfing pattern on itc

Bearish Engulfing Candlestick बेअरिश एनगालफईंग कॅन्डलस्टिक (मंदी)

Bearish Engulfing Pattern हा दोन विरुद्ध-रंगीत बॉडीजचा एक मोठा रिव्हर्सल पॅटर्न आहे. मार्केट हे अप ट्रेंड मध्ये असते. मार्केट हे आपल्या आदल्या दिवशीच्या बंद पेक्षा वरती ओपन होते परंतु दिवसभरात किंवा त्याच्या टाईम फ्रेम मध्ये तेथे सेलिंग प्रेशर वाढते आणि कॅण्डल बंद होताना ती आदल्या दिवशी च्या ओपेन पेक्षा खाली बंद होते म्हणजेच लाल रंगाची कँडल तयार होते. ही लाल रंगाची कॅण्डल आदल्या दिवशीच्या हिरव्या रंगाच्या कॅन्डल ला पूर्णपणे व्यापते. हा येणाऱ्या डाऊनट्रेंड downtrend चा एक संकेत मानला जातो कारण येथे मार्केट मधील तेजी करणारे bulls चा कॉन्फिडन्स तोडला जातो. मार्केट आदल्या दिवशी पेक्षा जास्त किमतीला हाय ला ओपेन झाले असले तरी जोरदार विक्री होऊन ते low ला बंद होते. पॅटर्न हा खाली दिलेल्या आकृती मध्ये आहे तसा दिसतो.

Bearish engulfing pattern on nifty

जर तुम्हाला अशाच शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट टिप्स, शेअर मार्केट अभ्यास याची माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाइट वरील इतर ब्लॉग सुद्धा वाचू शकता. येथे पाहा – Categories – TradersKatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *